स्वप्न

स्वप्न म्हणाले मला
किती रे तू त्रास देतोस
दमून भागून आल्यावर
झोपायचे सोडून मला छळतोस

मी म्हणालो मित्रा
अरे तू का असा रडतोस
त्रास होतो तुला
पण माझ्या पंखाना बळ देतोस

जागेपणी जे शक्य नाही
ते तू चुटकीसरशी जमवतोस
मनात येणारी उदासी
किती पटकन घालवतोस

तुझ्यामुळेच तर मला
नवा विश्वास मिळतो
आधार देतोस सतत
म्हणून तू मला भावतो

स्वप्न म्हणाले मित्रा
खरचं मी चुकलो
दोष दिला तुला
अकारण चिडलो

आता नाही रागावणार
दोस्ता, मदत तुला करणार
तुझ्या जीवनाचा
आधार मी बनणार

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ