मस्तराम

मस्तराम

मी मस्तराम जगतो आनंदात
रोजचा दिवस घालवतो सुखात
करत नाही चिंता ना करतो गडबड
कशाला हवी धांदल अन् उगीच बडबड ।

जे मिळते पदरात ते समजतो माझे
नाही मला हाव जे आहे दुसर्‍याचे
उठतो सकाळी आनंदात, झोपतो सुखाने
अनुभव हा माझा तुम्ही पण घ्या आवडीने ।

आहे एकच छंद, चांगले वागण्याचा
माणसाला, माणूस म्हणून वागवण्याचा
दुसर्‍याच्या दुःखात दुःखी होण्याचा
न मागता दुसर्‍याला आनंद देण्याचा ।

तुमच्यात पण आहे, एक मस्तराम
ओळखा त्याला नका करू रामराम
देईल तो तुम्हाला समाधान खात्री आहे माझी
व्हाल सुखी तुम्ही, नक्कीच ह्या जगी ।

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ