राजकारणी

आम्ही राजकारणी
लोकहितवादी वरकरणी
आतून पक्के स्वार्थी
आव आणतो परमार्थी

नैतिकता म्हणजे रे काय
सर्व धंद्यात आमचे पाय
पैशाबिगर काहीच चालत नाय
शिक्षणसंस्था आमच्यासाठी दुभती गाय

कशाचाही मांडतो आम्ही बाजार
गुन्ह्यासाठी नाही लागत अवजार
झाली जनता आमच्यामुळे बेजार
पर्वा नाही जरी झाली निराधार

तुंबडी आमची भरली पाहिजे
त्यात वाढ सतत झाली पाहिजे
आमच्याविरूद्ध जो बोलण्यास धजे
ईश्वरही रक्षण करू शकत नाही त्याचे

आजचा वैरी उद्याचा मित्र
संचार आमचा असतो सर्वत्र
कोणीही नाही आमच्यासाठी अपात्र
ज्याच्यापासून फायदा तो पात्र

गेंड्याची कातडी सापाचे विष
पात्रतेचे हे असती निकष
सतत आम्हाला हवे असते यश
पचवू शकत नाही आम्ही अपयश

सत्कर्मे आम्ही केली जरी
फायदाच त्यात बघतो खरोखरी
फुकटची नसते आमची वारी
मिळेल ते सारे खिशात सारी

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ