असेच काहीतरी

केल्याने होते आहे रे आधी केलेची पाहिजे
ऐकून वाचून झाले पण आचरणात नाही आणले
जो दुसर्‍यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला
स्वतःवरी विश्वास ठेवला तोच सुखी झाला

खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी
जणू आहेत तुझ्यापाशी धनांच्या राशी
नको मारूस स्वतःच स्वतःच्या पायावर कुर्‍हाड
नाहीतर रस्त्यावर येईल तुझे वर्‍हाड

काखेत कळसा गावाला वळसा
विचार करा विसरभोळेपणा टाळणार कसा
दुध गरम लागले म्हणू ताक नका फुंकून पिऊ
घरोघरी हीच बोंब म्हणून नका फुशारून जाऊ

ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या वाण नाही पण गुण लागला
असे असुन सुद्धा तो माझ्याशीच भांडला
करून सवरून भागला अन् देवपूजेला लागला

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ