नवरा बायको

नवरा बायको

नवरा आणि बायको
दोन चाके संसाराची
चर्चा ही मुळीच नको
कोणाची बाजू महत्वाची

नवरा झटतो घर बनवतो
बायको देते घराला घरपण
ऐका तुम्हाला म्हणून सांगतो
घरासाठी हवेत दोघेही जण

कष्ट करतो पैसा कमावतो
घरासाठी सोय करतो
उन्हातान्हात थंडी पावसात
मागे नाही पडत कष्टात

सर्वांची करते सतत काळजी
स्व ला विसरून चिंता इतरांची
सुखी असेल जर नवरा मुले
चेहर्‍यावर मग हसू फुले

जोडी ही आहे दोघांची
कोणी एक नाही मोठा
तुम्हाला आहे विनंती माझी
चर्चेला ह्या तुम्ही द्यावा फाटा

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ