आजच्या वर्तमानपत्रात नवर्याने बायकोला क्रूरतेने मारल्याची बातमी वाचून मन विषण्ण झाले.
अतिरेक
सगळीकडे हिंसा, क्रौर्य अन् जुलूम
चाललय ह्या पृथ्वीवर किती बेमालूम
कमी झाली माणुसकी ह्या आधुनिक जगात
असे असताना देवा कसा बसतोस तू स्वर्गात ।
तुझ्या ह्या जनतेवर नाही तुझे लक्ष
किती भयानक वागत आहेत ते तुझ्या अपरोक्ष
खाली ये ताबडतोब सोड तुझे कक्ष
नाहीतर करेल मानव, मानवालाच भक्ष ।
नाहीस तू बहिरा अन् नाहीस तू आंधळा
बघत काय राहिलास इथला गोंधळ सावळा
नवरा आवळतोय इथे बायकोचा गळा
वेळ नको लावूस घे हाती कारभार सगळा ।
ह्याचसाठीस बुद्धी माणसाला का तू दिलीस
नाही वागले नीट तर काय तरतूद केलीस
विचार ना जाब असा का वागलास
का बघून त्याचे वागणे तू पण सुन्न झालास ।
कसा काय माणूस स्वतःला बदलणार
का तो असाच मारत मारत मरणार
दायित्व तुझे कधी तू निभावणार
ये आता लवकर नाहीतर तुला माफ नाही करणार ।
अतुल दिवाकर
अतिरेक
सगळीकडे हिंसा, क्रौर्य अन् जुलूम
चाललय ह्या पृथ्वीवर किती बेमालूम
कमी झाली माणुसकी ह्या आधुनिक जगात
असे असताना देवा कसा बसतोस तू स्वर्गात ।
तुझ्या ह्या जनतेवर नाही तुझे लक्ष
किती भयानक वागत आहेत ते तुझ्या अपरोक्ष
खाली ये ताबडतोब सोड तुझे कक्ष
नाहीतर करेल मानव, मानवालाच भक्ष ।
नाहीस तू बहिरा अन् नाहीस तू आंधळा
बघत काय राहिलास इथला गोंधळ सावळा
नवरा आवळतोय इथे बायकोचा गळा
वेळ नको लावूस घे हाती कारभार सगळा ।
ह्याचसाठीस बुद्धी माणसाला का तू दिलीस
नाही वागले नीट तर काय तरतूद केलीस
विचार ना जाब असा का वागलास
का बघून त्याचे वागणे तू पण सुन्न झालास ।
कसा काय माणूस स्वतःला बदलणार
का तो असाच मारत मारत मरणार
दायित्व तुझे कधी तू निभावणार
ये आता लवकर नाहीतर तुला माफ नाही करणार ।
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment