भावना

सरळ असतो रस्ता
वेडीवाकडी वाट
आयुष्यरूपी रस्त्यावर
भावनांचा थाट

वळणे घेण्यास भाग पाडती
आयुष्यामध्ये भावना
असू दे मग कितीही
सरळ जगायची कामना

कधी वर कधी खाली
आयुष्यातील चढउतार
कधी तीक्ष्ण कधी बोथट
भावनांमुळे धार

तरी देखील सांगतो
नका राग त्यांचा करू
अहो त्यांच्यामुळेच तर पळते
हे आयुष्याचे तारू

नसत्या भावना आयुष्यात
आयुष्य झाले असते नीरस
त्यांच्यामुळेच आयुष्य चवदार
अन् त्यात अनेक रस

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ