आरोग्य
आरोग्य
आभासी जगातील आभासी नाती
स्पर्शाची महती समजतील किती
आभासी भावना शब्दांचा खेळ
कसा साधावा जीवनात ताळमेळ
एका क्लिकवर मिळतो पुस्तकांचा खजिना
साद घालतो मला वाचनालयाचा जिना
ग्रंथालयातील खजिना आनंद देतो
E-book नव्हे तर मी पुस्तकांमधेच रमतो
झटक्यात मिळते विदेशातील E mail
ख्याली खुशाली आता पटकन कळेल
लोकांची किती छान सोय ही झाली
पत्राची वाट पहायची हुरहुर मात्र लोपली
घरबसल्या selection घरबसल्या खरेदी
दुकानदारा बरोबर हक्काची कसली आता नाती
Cell वरून यादी अन् घरपोच सामान
आजच्या जगातला Trend हा महान
वापरा मोबाईल अन् जा त्याच्या आहारी
सवय आता लागली, काय करणार स्वारी
मोजा पैसे अन् आरोग्य घ्या विकत
डाॅक्टरचा फेरा आता नाही चुकत
समजून हा इशारा व्हाल जर शहाणे
गॅझेट्सची वजाबाकी अन् जंक फुड उणे
जवळ करा मैदान ठेवा रोजचे चालणे
निरोगी रहाल, नियमित ठेवाल जर धावणे
अतुल दिवाकर
आभासी जगातील आभासी नाती
स्पर्शाची महती समजतील किती
आभासी भावना शब्दांचा खेळ
कसा साधावा जीवनात ताळमेळ
एका क्लिकवर मिळतो पुस्तकांचा खजिना
साद घालतो मला वाचनालयाचा जिना
ग्रंथालयातील खजिना आनंद देतो
E-book नव्हे तर मी पुस्तकांमधेच रमतो
झटक्यात मिळते विदेशातील E mail
ख्याली खुशाली आता पटकन कळेल
लोकांची किती छान सोय ही झाली
पत्राची वाट पहायची हुरहुर मात्र लोपली
घरबसल्या selection घरबसल्या खरेदी
दुकानदारा बरोबर हक्काची कसली आता नाती
Cell वरून यादी अन् घरपोच सामान
आजच्या जगातला Trend हा महान
वापरा मोबाईल अन् जा त्याच्या आहारी
सवय आता लागली, काय करणार स्वारी
मोजा पैसे अन् आरोग्य घ्या विकत
डाॅक्टरचा फेरा आता नाही चुकत
समजून हा इशारा व्हाल जर शहाणे
गॅझेट्सची वजाबाकी अन् जंक फुड उणे
जवळ करा मैदान ठेवा रोजचे चालणे
निरोगी रहाल, नियमित ठेवाल जर धावणे
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment