प्रेम

एक अव्यक्तपणे व्यक्त होणारी भावना
हळुवारपणे फुलत जाणारी कोमलता
आपलच असून दुसर्‍यासाठी धडधडणारं हृदय
किंवा अलगदपणे मनावर फिरणारं मोरपिस

जेव्हा सर्व रस्ते बंद होतात तेव्हा हाताला धरून वाट दाखवणारा दिलासा
जेव्हा मन हताश झालेलं असत तेव्हा मिळणारा सळसळता उत्साह
जीवनरूपी वाळवंटात बरसणारा पाऊस
किंवा अमावस्येच्या रात्री चमचमणाऱ्या काजव्यांचा प्रकाश

तिच्या डोळ्यात हरवून गेलेला मी
किंवा माझ्यामधे मिसळून गेलेली ती
शरीरे दोन पण एक मन
एकाच्या हृदयात दुसर्‍याचे स्पंदन

प्रेमाशिवाय हे जीवन व्यर्थ
प्रेमामुळेच तर जीवनाला अर्थ
प्रेमामधे नसतो स्वार्थ
प्रेम करते जीवन सार्थ

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ