सांगा कसं जगायचं?

पाडगावकरांची क्षमा मागून.

सांगा कसं जगायचं?

सगळीकडे प्रदूषण अन् आकाशात धुरांचे लोट
चला हवा येउ द्या म्हणत निलेश हसवतो लोटपोट
नाकावर हात ठेउन रडायचं का पोट धरधरून हसायचं
तुम्हीच ठरवा कसं जगायचं ।

रस्ते गेले वाहनांनी भरून अन् चालायला सुद्धा जागा नाही
आपल्या लोकांच्या हृदयात मात्र अढळ स्थान आपलं सही
रस्त्यावरच्या गर्दीला नाक मुरडायचं का आपल्या लोकांच्या हृदयात घर करायचं
तुम्हीच ठरवा कसं जगायचं ।

ऑनलाईनचा जमाना घरबसल्या करा कामे सगळी
किंवा लोकांना भेटण्यासाठी गाठा रांगेची वाट वेगळी
डोळे चोळत आणि तब्येत बिघडवत जगायचं
का चालत पळत तब्येतीत रहायचं
तुम्हीच ठरवा कसं जगायचं ।

जमाना स्पर्धेचा , एकमेकांच्या पुढे जायचा
जमाना नाविन्यतेचा वेगळा वाटा चोखाळायचा
आपल्या मुलांना स्पर्धेत ढकलायचं
का त्याच्या धाडसाचं कौतुक करायचं
तुम्हीच ठरवा कसं जगायचं ।

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ