मन माझे

मना तुला कसे सांभाळू
ताब्यात ठेवण्यासाठी का कुरवाळू
तू तर स्वतःच्याच धुंदीत चालतोस
आमच्या इच्छेवर थोडीच तू झुलतोस ।।

झाडांसाठी आपण खतपाणी घालतो
पक्ष्यांना आपण दाणापाणी देतो
स्वतः अन्नावर उभा आडवा हात मारतो
तुझ्यासाठी बोल, काय करावे म्हणतोस ।।

मला हवा वर्तमान, तू फिरतोस भूतकाळात
ओढून ताणून आणले, तर क्षणात जातो भविष्यात
कसा रे तू थकत नाहीस, थोडासुद्धा दम घेत नाहीस
सतत उड्या मारायचे, तुझे काम थांबवत नाहीस ।।

तुझ्यासाठी मी, काय काय नाही केले
कितीतरी देवळांचे उंबरठे झिजवले
तू मात्र मला नेहमीच खिजवले
बरोबर राहीन म्हणत सतत फसवले ।।

काय हवे तुला, एकदाचे सांगच मला
बघतोच मग कसे, कह्यात ठेवायचे तुला
सुरळीत बघ कसे, होईल मग जीवन
उन्हाळ्यात जणू, येईल मग सावन ।।

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ