आजच्या तरूणाईचे वास्तव. एक जळजळीत सत्य.

आजची पिढी

आजची पिढी निरर्थक
मोबाईलवर असते अथक
टीव्ही म्हणजे जन्माचे सार्थक
कधी बनतील हे विद्येचे साधक

अंगात असे तारूण्याची मस्ती
यांच्या लेखी नाती सस्ती
नाही यांना जिंदगीची धास्ती
मौजमजेची अंगी वस्ती

ओतप्रोत भरला कंटाळा
मैदान सोडून मोबाईलवर खेळा
सोसत नाहीत आयुष्याच्या झळा
यांच्यावर बिसंबा अन् सोसा कळा

शिस्त म्हणजे असते काय
व्यायमाची सवय नाय
घरात कमी बाहेरच पाय
ऐसे जगणे हाय हाय

काही असती यांच्यात वेगळे
ते राजहंस बाकी बगळे
जीवन त्यांचे असे आगळे
सर्वसामान्य बाकी सगळे

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ