तू

तू

तू कशी,
तर तप्त उन्हातील गार झुळूक असावी तशी
दिसत नसूनही जाणवणारी
एका क्षणात आनंद पसरवणारी

तू कशी,
तर शेकोटीची ऊब थंडीमध्ये असावी तशी
दूर असलो तरी डोळ्यांना जाणवणारी
जवळ असलो की आधार देणारी

तू कशी,
पूर्वेच्या उगवणार्‍या सुर्यबिंबासारखी
जर दिसली नाहीस तर बेचैन मन
आणि तुझ्याचमुळे आहे आनंदी जीवन

तू कशी,
पौर्णिमेच्या चंद्रासारखी
कुठेही असलो तरी मनाला शांत करणारी
जीवनरूपी अमावस्येचा अंधार दूर करणारी

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ