मन

जेव्हां करतो मी डोळे बंद
मिळवण्यासाठी थोडी शांतता
विचारांची उसळते मनात लाट
मग शांततेची लागते वाट

ह्या मनाकडून घेण्यासारखा
दिसतो मला चांगला गुण
अविरत करत रहा कष्ट
नका मानू हा अवगुण

शांतता किंवा अशांतता
हे तर आहेत मनाचे खेळ
तुम्ही करा आयुष्य सुंदर
यांचा घालून योग्य मेळ

क्षणात भूत क्षणात भविष्य
का रे मना देतोस ही सजा
अरे जगू दे ना वर्तमानात
त्यात आहे वेगळीच मजा

कसा रे तू दमत नाहीस
कुठली आहे तुझ्यात शक्ति
मार्ग आम्हाला मिळत नाही
देवाची कितीही केली भक्ति

कधीही मी तुझ्याकडे आलो
तर तू असतोस सतत बिझी
नकोस एवढे कष्ट करूस
Don't mind, take it easy

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ