प्रवास

दगड आणि विटांनी
बांधतात इमारत
घर हवे असल्यास
हवे माणसांमधे एकमत

असतील सर्वांची जर
तोंडे दहा दिशांना
विसरा एकोपा
मावळल्या सर्व आशा

थोडेसे चिडणे
थोडे काॅम्प्रमाईज
असे जर वागाल
तर ठराल वाईज

थोडे पकडा
थोडे सोडा
आयुष्याचा वाडा
आनंदी करून सोडा

मंत्र हा आहे सुखाचा
तुमच्या आमच्या आनंदाचा
विसरा आता प्रवास दुःखाचा
प्रवास करा समाधानी आयुष्याचा

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ