मस्त रविवार

आठवड्यातून एकच रविवार
करावा मस्त आराम
उशिरा पर्यंत रहावे लोळत
नसावे काही काम धाम

या दिवसाची वेगळीच मजा
जाम खुश असते मन
कंटाळा कंटाळा करत
कष्टाला तयार नसते तन

उशिरा उठावे, आरामात आवरावे
पेपर वाचनात तासनतास घालवावे
आवडीचा नाश्ता अन् गरमागरम चहा
तोपर्यंत वाजतात घड्याळात दहा

करावा विचार मग आंघोळीचा
मनाविरूद्धच घुसावे स्नानगृहात
तेथेही काढावा भरपूर वेळ
स्वप्नांच्या दुनियेत जावे वहात

नको वेळेची कॅलक्युलेशन्स
प्रत्येक कामासाठी घड्याळाचे समन्स
झुगारून सगळ्यांची सर्व बंधने
ऐकावी फक्त मनाची स्पंदने

एरवी चटपट हालणारे हातपाय
आज होऊन जातात गोगलगाय
नको वाटतात तेवढेही कष्ट
उत्साह झालेला असतो नष्ट

जेवणानंतर वामकुक्षी, अहाहा! काय सुख
इकडून तिकडे लोळावे करून आनंदी मुख
सूर्य येता अस्ताला मग उघडावे डोळे
मिळावा मस्त चहा नजर हळूच किचनकडे  वळे

पहावा टि व्ही वा जावे फिरावयास
आज जे करू वाटे ते खास
भरपूर आराम अन् सुस्ती अंगात
वाटे हेच असे सुख ते जगात

किती बरे पटकन रविवार हा संपतो
सोमवार तो येऊन समोर ऊभा राहतो
देवा मी तुझे मानीन शतशः आभार
दिलेस जर आठवड्यात दोन चार रविवार

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ