खळबळ

जर म्हटले तर आहे शिक्षा
अथवा झोळीत घालेल भिक्षा
जे सर्वांना परिचित आहे
त्याला म्हणतात वाट पहाणे

कळत नाही काय करावे
थांबावे का निघून जावे
का मनातल्या मनात चरफडत रहावे
अन् परिस्थितीवर चिडून जावे

दोष द्यावा तरी कोणाला
प्रत्येकास हा अनुभव आला
ज्याने अनुभव कामी लावला
आनंद त्याने इतरांस दिला

वेळ मोकळा पण मनात गोंधळ
वाटे सर्व कारभार भोंगळ
कळेना किती काढावी कळ
खळबळ खळबळ नुसती खळबळ

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ