टिळक व बाप्पांचा संवाद

बाप्पा तुमच्याशी मला, थोड बोलायचं आहे
आज समाजातील लोकांशी कस वागायच, ते ठरवायचं  आहे ।

काय काय ठरवून उत्सव तुमचा, केला होता सुरू
वाटले होते भारतमातेला, परक्यांच्या जोखडातून मुक्त करू
कल्पनाच नव्हती की पिढी, बेशिस्तीच्या आहारी जाईल
स्वतःबरोबरच माझ्या मातेला, इतका त्रास देईल ।

म्हणून म्हणतो बाप्पा, तुमच्याशी मला थोड बोलायचं आहे
आज समाजातील लोकांशी कस वागायच, ते आता ठरवायचं  आहे ।

दिले होते मुलांना, मी सर्व संस्कार
केला होता प्रयत्न, त्यांच्या आयुष्याला द्यायला आकार
कधी हे संस्कार तुटले ते कळालेच नाही
आयुष्य त्यांचे भरकटले, दोर तुटलेला पतंग जणू काही

म्हणून म्हणतो बाप्पा, तुमच्याशी मला थोड बोलायचं आहे
आज समाजातील लोकांशी कस वागायच, ते आता ठरवायचं  आहे ।

उत्साही तरूणाईचे स्वप्न, बघितले होते मी
जाज्वल्य देशप्रेमापुढे ठराव्यात, इतर गोष्टी निकामी
गॅजेट्सच्या आहारी गेलेल्या तरूणांना, योग्य मार्ग दाखवायचा आहे
माझ्या स्वप्नातली तरूण पिढी, मला घडवायची आहे

म्हणून म्हणतो बाप्पा, तुमच्याशी मला थोड बोलायचं आहे
आज समाजातील लोकांशी कस वागायच, ते आता ठरवायचं  आहे ।

तुम्ही एक निमित्त होता, लोकांना एकत्र आणण्यासाठी
सोडवायच्या होत्या मला, जुलुमांच्या अनेक गाठी
भारताला करून स्वतंत्र, बनवायचा होता प्रगत देश
कल्पनाच नव्हती जनता, स्वार्थी वागून तुम्हाला देईल क्लेष

म्हणून म्हणतो बाप्पा, तुमच्याशी मला थोड बोलायचं आहे
आज समाजातील लोकांशी कस वागायच, ते आता ठरवायचं  आहे ।

कराल ना मला मदत नवभारत घडवण्यासाठी
परत परत मी जन्म घेईन जर असाल तुम्ही माझ्या पाठी
आपण कधी हार मानायची नाही हे तुमच्याकडून शिकलो आहे
ह्या गणेशोत्सवापासूनच त्याची सुरवात करणार आहे

म्हणून म्हणतो बाप्पा, तुमच्याशी मला थोड बोलायचं आहे
आज समाजातील लोकांशी कस वागायच, ते आता ठरवायचं  आहे ।

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ