पाऊस
तरसलेल्या मनावर
पाऊस तो बरसला
दाह माझ्या मनाचा
शांत करून गेला
किती मी बघू
घना तुझी रे वाट
उशिरा का असेना
आलास तू घनदाट
आसमंतात सार्या
उत्साह तो पसरला
उशिरा का असेना
पाऊस तो बरसला
तुझ्यासाठी हरेक जण
चातक तो बनला
हळूच बघ कसा
नभात तू दिसला
नको रे असा
आम्हावरी तू चिडूस
प्रतिक्षा दरवर्षी
आमची तू वाढवूस
अतुल दिवाकर
तरसलेल्या मनावर
पाऊस तो बरसला
दाह माझ्या मनाचा
शांत करून गेला
किती मी बघू
घना तुझी रे वाट
उशिरा का असेना
आलास तू घनदाट
आसमंतात सार्या
उत्साह तो पसरला
उशिरा का असेना
पाऊस तो बरसला
तुझ्यासाठी हरेक जण
चातक तो बनला
हळूच बघ कसा
नभात तू दिसला
नको रे असा
आम्हावरी तू चिडूस
प्रतिक्षा दरवर्षी
आमची तू वाढवूस
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment