मी बालक

रांगत रांगत चालू लागलो
चालता चालता पळू लागलो
कळेना मग माझेच मजला
बालपण कधी हरवून बसलो

बोबडे बोल बोलता बोलता
किती कठोर बोलू लागलो
मार्दव माझ्या वाणीमधील
कळेना कधी घालवून बसलो

व्यवहारी जगात जगता जगता
निरागसता लोप पावली
कमाई मग मोजता मोजता
नात्यांमधली भावना संपली

बालदिनाचे निमित्त झाले
स्वतःलाच मग शोधू लागलो
मोठेपणाचा मुखवटा टाकून
बालक होऊन रांगू लागलो

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ