गुपित

जेव्हापासून आलो पृथ्वीवर
जणू काही शर्यतच सुरू झाली
जीवघेण्या ह्या स्पर्धेत
जगण्याची मग मजाच गेली ।

लहानपणीचे परावलंबी जीवन
वागणे इतरांच्या मनाप्रमाणे
अन्यथा मग मिळे शासन
स्वत्वासाठी रोजच झगडणे ।

मित्रांसोबत काही घटका
होता उशीर मिळे फटका
दिन ते गेले ठेउनी आठवण
मनात माझ्या आठवणींची साठवण ।

मंतरलेले दिवस आले
वेगळेच विश्व मला दिसले
जमिनीवर जरी असलो
तरंगावयाचे गुपित कळाले ।

अतुल दिवाकर




Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ