आयुष्याचे झाड

आयुष्य म्हणजे एक झाड

मुळे आहेत पिढीजात संस्कार
तीच तर असतात जगण्याचा आधार
जेवढी मुळे खोल तेवढे झाड उंच
पिढ्यांची पुण्याई बनवते माणसाला स्वच्छ  ।

खोडाचे काम देणे फांद्यांना आधार
तसे स्वभावच आहे तुमच्या जीवनाचे सार
असेल जर स्वभाव गुणी अन् सत्शील
मैत्री आणि नाती नक्कीच टिकवशील ।

फांद्या म्हणजे आहेत झाडाचाच विस्तार
दृष्टिकोनच तुमचा बनेल जनाधार
जेवढ्या दूर पसरतील वृत्तीचे तरंग
समवैचारिक जनांचा लाभेल तुम्हा संग ।

व्यक्तिमत्व आहे या झाडाची पाने 
जग तुम्हाला बघते याच्या रूपाने
नका बदलू रंग ऋतुमानाप्रमाणे
आयुष्यभर मग गात रहाल जीवनगाणे ।

पाने फुले ही तर आहे कमाई
आरोग्य राखाल तरच मिळेल ही मलई
शरीर आणि मन असेल तंदुरुस्त
समस्या मग संपल्याच समस्त ।

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ