पाऊस

हिरव्यागार झाडावर
लाल लाल फूल
असे वाटतय जणू
झाडाने घातलय कानात डूल

क्षणात आले दाटून मेघ
दिसतीये समोर पावसाची रेघ
तहानलेल्या धरतीला भेटायला आला
वरूणराजा क्षणात बरसला

आत्ता होते ऊन, क्षणात रस्ते ओले
निसर्गाची गंमत बघून मन डोले
रमून गेलो बघून हा खेळ
देव बरोबर साधतो ऋतुचक्राचा ताळमेळ

पसरला गारवा वातावरण छान
भावाने (वरूण) ठेवला बहिणीचा (धरती) मान
चालली होती वाळून वसुंधरा
म्हणून येऊन पाऊस जोरात बरसला

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ