जोडी
तांबडे फुटले दिवस उगवला
आनंदाने कोंबडा आरवला
सूर्यबिंब ते नभी अवतरले
उत्साहाचे साम्राज्य पसरले
सरता दिवस निशा बघ आली
उत्साहाची नशा ती सरली
सारी रयत थकून गेली
हळूच जाऊन पांघरूणात शिरली ।।1।।
आज असे मला काय झाले
रोजचेच जग नवे दिसू लागले
हात लावता जणू सोने झाले
आनंदाने मन भरून गेले
किती हे दुःख माझ्या पदरी
मनही जणू झाले आजारी
विधात्याने बघ दुःखे सारी
ठेवली आणून माझिया शिरी ।।2।।
आज असे पेपरात आले
ब्रेनडेड बाईने आपले अवयव दिले
चारजणांचे भले झाले
जगात लोक किती चांगले
विश्वासच नाही असेही असते
कुंपणच इथे शेत खाते
आपलेच रक्त जीवावर उठते
वाईटाचे राज्य पसरते ।।3।।
पैशांच्या राशी करोडोंचे बंगले
ऐश्वर्याचे दिवस चांगले
चांदीची ताटे सोन्याचे चमचे
आविर्भाव ऐसा हे विश्वची आमचे
खायची मारामार जगायचे वांद्य
बाॅसची आज्ञा शिरसावंद्य
हातावर पोट कष्टाची भाकर
आयुष्य संपले बनून नोकर ।।4।।
मर्दानी गडी मनगटात ताकद
मिशीला पीळ हाकेला येई धावत
दुनियेचा भार शिरावर पेलत
कष्टाला नाही मागेपुढे बघत
मायेचा सागर करूणेचे आगर
प्रसंगी चंडिकेचे रूप अनावर
संस्काराची जननी सौंदर्य खरोखर
सहनशीलतेचे असे सरोवर ।।5।।
अतुल दिवाकर
तांबडे फुटले दिवस उगवला
आनंदाने कोंबडा आरवला
सूर्यबिंब ते नभी अवतरले
उत्साहाचे साम्राज्य पसरले
सरता दिवस निशा बघ आली
उत्साहाची नशा ती सरली
सारी रयत थकून गेली
हळूच जाऊन पांघरूणात शिरली ।।1।।
आज असे मला काय झाले
रोजचेच जग नवे दिसू लागले
हात लावता जणू सोने झाले
आनंदाने मन भरून गेले
किती हे दुःख माझ्या पदरी
मनही जणू झाले आजारी
विधात्याने बघ दुःखे सारी
ठेवली आणून माझिया शिरी ।।2।।
आज असे पेपरात आले
ब्रेनडेड बाईने आपले अवयव दिले
चारजणांचे भले झाले
जगात लोक किती चांगले
विश्वासच नाही असेही असते
कुंपणच इथे शेत खाते
आपलेच रक्त जीवावर उठते
वाईटाचे राज्य पसरते ।।3।।
पैशांच्या राशी करोडोंचे बंगले
ऐश्वर्याचे दिवस चांगले
चांदीची ताटे सोन्याचे चमचे
आविर्भाव ऐसा हे विश्वची आमचे
खायची मारामार जगायचे वांद्य
बाॅसची आज्ञा शिरसावंद्य
हातावर पोट कष्टाची भाकर
आयुष्य संपले बनून नोकर ।।4।।
मर्दानी गडी मनगटात ताकद
मिशीला पीळ हाकेला येई धावत
दुनियेचा भार शिरावर पेलत
कष्टाला नाही मागेपुढे बघत
मायेचा सागर करूणेचे आगर
प्रसंगी चंडिकेचे रूप अनावर
संस्काराची जननी सौंदर्य खरोखर
सहनशीलतेचे असे सरोवर ।।5।।
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment