वादा

वठलेल्या झाडावर डोलत होते एक पान
जगण्याची उमेद मनात घेऊन
विपरीत परिस्थितीत उभे रहाण्याचा
संदेश सर्व जगाला देऊन

खडतर होते त्याचे आयुष्य
दिसत नव्हता कोठेही दिलासा
ना कोणी मित्र वा भाईबंद
होता त्याचा स्वतःवर भरोसा

एक जबरदस्त आत्मविश्वास
भरपूर ओसंडून वाहत होता
जरी होता नाजुक जीव
टक्कर द्यायला ऊभा होता

वार्‍याच्या झुळुकीवर
छान होते डोलत
मजेत मी जगणार
जणू स्वतःशीच बोलत

प्रत्येकजण त्याच्याकडे
कुतुहलाने पहात होता
ते जाणून आनंदाने
गाल्यातल्या गालात हासत होता

हा होता वेगळाच अनुभव
माझ्यासाठी बरं का दादा
उमेद कधीही हारायची नाही
केला मी स्वतःशीच वादा

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ