बदल
आली दिवाळीची सुट्टी
शहरी मुलांना हवा बदल जरा
गावाकडची मुले राबतात उन्हात
येउन शेतात बघ जरा
रहायला बंगला फिरायला गाडी
शहरामधली ऐटच न्यारी
मातीचे घर शेणाने सारव
जाता येता बैलगाडीची वारी
हायफाय टीव्ही वायफाय नेट
भरपूर चॅटिंग क्वचितच भेट
लंगडी, खोखो, चोर पोलीस
शेतात पंगत खा भरपेट
पैसे द्या अन् व्यायाम करा
तब्येत नीट ठेवायला सल्ला घ्या
जीवनशैली व्यायामाने परिपूर्ण
विहीरीत डुंबा, रानमेवा खा
शहरी लोक गावाकडे येतात
एक बदल हवा म्हणून
गावाकडच्या आम्हाला
काय हवे आधी घ्या जाणून
अतुल दिवाकर
आली दिवाळीची सुट्टी
शहरी मुलांना हवा बदल जरा
गावाकडची मुले राबतात उन्हात
येउन शेतात बघ जरा
रहायला बंगला फिरायला गाडी
शहरामधली ऐटच न्यारी
मातीचे घर शेणाने सारव
जाता येता बैलगाडीची वारी
हायफाय टीव्ही वायफाय नेट
भरपूर चॅटिंग क्वचितच भेट
लंगडी, खोखो, चोर पोलीस
शेतात पंगत खा भरपेट
पैसे द्या अन् व्यायाम करा
तब्येत नीट ठेवायला सल्ला घ्या
जीवनशैली व्यायामाने परिपूर्ण
विहीरीत डुंबा, रानमेवा खा
शहरी लोक गावाकडे येतात
एक बदल हवा म्हणून
गावाकडच्या आम्हाला
काय हवे आधी घ्या जाणून
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment