चेहरा आणि मुखवटा
चेहरा आणि मुखवटा
मुखवट्यामागून हळूच चेहरा एक दिसला
मुखवटा होता क्रोधित, चेहरा खुदकन हसला
कोणाला कोण लपवत होते प्रश्न मला पडला
आपापल्या परीने दोघेही प्रयत्न करत होते चांगला ।
जगामधे वावरायला मुखवटा करतो धारण
चेहरा लपवायचे काय बरे कारण ?
तरीसुद्धा नेहमी असेच करतो आपण
चेहर्याला नेहमीच, ठेवतो आपण तारण ।
मनाचे प्रतिबिंब चेहर्यावर उमटते
भावनांचे द्वंद्व सगळयांना कळते
मुखवटा म्हणूनच का चेहर्याला झाकतो
मन कळू नये असा प्रयत्न तो करतो ।
काय होईल मधेच जर मुखवटा पडला गळून
मनातले भाव जगाला येतील कळून
योग्य आहे हे असे नाही का तुम्हां वाटत
मनापासून सांगितले तर का नाही पटत ।
टाकून द्या मुखवटा करा चेहराच धारण
नक्कीच होईल तो तुमच्या समाधानाचे कारण
नका करू मुखवट्याचे लाड विनाकारण
करा मुखवट्याचे हरण अन् जा चेहर्याला शरण ।
अतुल दिवाकर
मुखवट्यामागून हळूच चेहरा एक दिसला
मुखवटा होता क्रोधित, चेहरा खुदकन हसला
कोणाला कोण लपवत होते प्रश्न मला पडला
आपापल्या परीने दोघेही प्रयत्न करत होते चांगला ।
जगामधे वावरायला मुखवटा करतो धारण
चेहरा लपवायचे काय बरे कारण ?
तरीसुद्धा नेहमी असेच करतो आपण
चेहर्याला नेहमीच, ठेवतो आपण तारण ।
मनाचे प्रतिबिंब चेहर्यावर उमटते
भावनांचे द्वंद्व सगळयांना कळते
मुखवटा म्हणूनच का चेहर्याला झाकतो
मन कळू नये असा प्रयत्न तो करतो ।
काय होईल मधेच जर मुखवटा पडला गळून
मनातले भाव जगाला येतील कळून
योग्य आहे हे असे नाही का तुम्हां वाटत
मनापासून सांगितले तर का नाही पटत ।
टाकून द्या मुखवटा करा चेहराच धारण
नक्कीच होईल तो तुमच्या समाधानाचे कारण
नका करू मुखवट्याचे लाड विनाकारण
करा मुखवट्याचे हरण अन् जा चेहर्याला शरण ।
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment