कायापालट

कायापालट

तुमची एक मनापासून दाद
किंवा पाठीवरची हलकी थाप
पुरेशी आहे मला जीवनाशी लढायला
मागे उभे आहात हेच खुप आहे जगायला

येवोत आता कितीही संकटे
अथवा वाटू दे मला एकटे
उभा राहिन जिद्दीने मी
आता नाही कसलीच कमी

नको मला कुणाची मेहेरबानी
कशाला हवी आश्वासने नवनवी
माझा आहे विश्वास माझ्यावर
बळ मिळाले माझ्यावरील विश्वासावर

कायापालट केला तुम्ही
आव्हानांशी लढीन मी
आयुष्याला टक्कर देउन
नवी क्षितीजे गाठीन मी

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ