युरेका कसा आवरू या मनाला किती हे इकडून तिकडे पळते जरी म्हटले सरळ चल तरी सतत तिरके वळते ध्यान केले जप केला रामनामाचा गजर केला कळलेच नाही तरीसुद्धा कंट्रोल कधी सुटून गेला समजावले किती सांगितले किती, कितीतरी घेतले श्रम एका झटक्यात वाया गेले सर्व माझे परीश्रम काहीच मला कळेना काहीच आता उमजेना कसे त्याला समजवू कोणीच मला सांगेना विचार करून पिकले डोके, बुद्धी काही चालेना मार्ग कसा काढावा माझे मलाच समजेना मग ठरवले काही झाले तरी हे युद्ध जिंकायचे एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून असे नाही हरायचे समजवासमजवी पुरे झाली आता हवी कृती अन्यथा माझ्याबरोबरच सर्वांची बिघडेल प्रकृती त्या क्षणापासून मला समजेना काय झाले एवढे मात्र नक्की झाले मन पळायचे थांबले अतुल दिवाकर
Posts
Showing posts from June, 2018
- Get link
- X
- Other Apps
सहजच आनंदाला उत्साहाची जोडणी दुःखावर सुखाची फोडणी निराशेवर करते मात आशा क्रूरतेला समजावते माणुसकीची भाषा वादावादीवर समजुतीचा तोडगा भयाला निर्भयतेचा बडगा नसता आवेश आणू नको उगा नाहीतर प्रकृती तुला देईल दगा रडणार्यांना तुम्ही थोडेसे हसवा पडणार्यांना हात देउन सावरा मृगजळाप्रमाणे जर विश्वास असेल फसवा तर नात्यांमधे जीव होतो कावराबावरा मनातील गोष्टी ओठावर आणा नाहीतर मिळेल नारळ नजराणा अंगी येऊ दे लढाऊ बाणा वेळेचे वेळेवर महत्व जाणा अतुल दिवाकर
- Get link
- X
- Other Apps
नवी पहाट नकोना प्रिये अशी रमू भूतकाळी नवी कर सुरवात तू दर सकाळी बदल थोडासा तू बघण्याचा नजरियाँ वाटेल बघ तुला मग आपलासा सावरियाँ तेच तुझे विश्व दिसेल मग नवे वाटेल तुला मग सर्व मला हवे हातात घालून हात साजणा सवे आनंदाचे हे क्षण चार घ्यावे मरगळ झटकता दिसेल सृष्टी नवी हर्षे मन रमता मग दुःखाने सुट्टीच घ्यावी गोष्टी बघण्याची मग द्रृष्टीच बदलावी आनंदाची जणू कशी शालच पांघरावी सरली बघ रात अन झाला अरुणोदय नावीन्याचा मनी बघ झाला हा उदय सगळीकडे पसरली ती आनंदाची किरणे आपण आता भूतलावरील या स्वर्गात फिरणे अतुल दिवाकर
- Get link
- X
- Other Apps
प्रश्न का बरे मला असे प्रश्न इथे पडतात देवाच्या राज्यात रोज अपराध का घडतात वात्सल्याचे सुदंर नाते कुस्करून टाकतो बाप आपल्याच पिल्लाला डसतो बनून विषारी साप नात्यांची ही नाती अशी का सडतात का बरे मला असे प्रश्न इथे पडतात भावाच्या नात्याला भाऊच देतो तडा पैशासाठी सांडतो रक्ताचा सडा आपले भाऊबंद आपल्यालाच नडतात का बरे मला असे प्रश्न इथे पडतात तू कोण मी कोण हे जग आहे कोणाचे स्वार्थासाठी बघ इथे कोणी नाही कोणाचे रोज रोज इथे अपराध नवे घडतात का बरे मला असे प्रश्न इथे पडतात पोटच्या जीवाला उकिरड्यावर सोडतात रक्ताची ही नाती किती सहजपणे तोडतात आयुष्य आनंदाने एकटेपणात काढतात का बरे मला असे प्रश्न इथे पडतात देवा तू कुठे आहेस बघ तुझी लेकरे आपल्याच लोकांना किती रे ओरबाडतात अवतार घे लवकर नको राहू जडत्वात का बरे मला असे प्रश्न इथे पडतात अतुल दिवाकर
- Get link
- X
- Other Apps
मैत्री हक्क दाखवावा हक्काने मागावे हक्काने रागवावे अशी जागा म्हणजे तू तू आहेस आमच्या जगण्याचा श्वास जसा सानुल्याला असतो आईवर विश्वास तूच तर देतेस आम्हाला जगण्याची शक्ति जशी श्रीकृष्णावरील मीरेची भक्ति तुझ्याशिवाय नाही करू शकत जगण्याचा विचार तूच आमचे सर्वस्व तूच आमचा आधार तू आहे म्हणून मी आहे, तुझ्याशिवाय जीवन व्यर्थ आहे तू नाहीस तर लागेल आमच्या जीवनाला बट्टा तुझ्यामुळेच मिळाला मला आमचा दहावीचा कट्टा. अतुल दिवाकर
- Get link
- X
- Other Apps
गिरणीवाला दळता कांडता जीवन संपे लई अवघड हे जगणे नाही सोपे दिवस उगवतो तसा मावळतो उभ्या उभ्याने मी घाम गाळतो कधी जवार कधी गहू कधी कधी डाळीचे दळण कधी लाडू कधी थालीपीठ गोल गोल चकलीचे वळण कष्ट करतो सर्वांसाठी देतो दोन आनंदाचे क्षण दिवस सरतो तेव्हा पडती पोटामध्ये अन्नाचे ते चार कण प्रत्येकाला असते घाई थांबायला तो नसतो वेळ सणासुदीला आमच्या ताटी भाकर आणि गोड केळ गिरणीची ती छोटी खोली सर्वत्र पसरती बारीक कण सर्व ऋतूंमधे काम करतो नाही सुट्टी नाही सण आनंदी मी उत्साही मी जन्म सार्थकी कष्टाचा कमी असला तरी नाही माझा पैसा हरामाचा अतुल दिवाकर
- Get link
- X
- Other Apps
होळी रंगांचा सण होळी खावी पुरणपोळी घेऊन भांगेची गोळी झिंगली जनता भोळी रंगमय झाल्या दिशा चढली होळीची नशा पाण्यात भिजल्या कशा आशा, उषा व मनिषा सोडू नका रे कोणाला जरी नाही म्हणाला रंगवा सर्व जणांला मजा येईल सणाला बुडवा राग हेवेदावे आनंद वाटा सर्वांसवे आता आम्हा हवे आहे सुंदर असे जग नवे होळीच्या रंगीत शुभेच्छा अतुल दिवाकर
- Get link
- X
- Other Apps
आजचे कुटुंब आज जरी मी आहे विभक्त, तरी उभा मी पायावर माझ्या मान्य मला ही कुटुंबरचना, त्रास का रे मना तुझ्या परावलंबी नाही जगणे आनंदाची आहे ना बाब स्वतःच्या मस्तीत गुंग असतो नाही कुणाला देतो ताप माॅडर्न मी इंडिपेंडट मी जगाबरोबर चालतो मी क्षणात इथे तर क्षणात तिथे जगाच्या कोपर्यात जातो मी जरी मी स्वार्थी जरी मी निर्दयी निष्ठुर आणि उद्धट मी आजही जन्मती टिळक, फुले अन मदर तेरेसा त्याच्या संगती वृद्ध माणसे अडगळ झाली घरामधे ती झाली ओझे नाही विसरलो जबाबदारी , वृद्धाश्रमही कुटुंब माझे वाव मला सुधारण्याचा मान्य मला नाही शंका जिद्द ठेवतो भारतभूमी करणार सोन्याची लंका अतुल दिवाकर
- Get link
- X
- Other Apps
Happy Days Happy days are here again मी आनंदाने सगळ्यांना सांगेन कित्येक वर्षे झाली तरी, सूर्य उगवायचा थांबला नाही कलयुगातील वाईट काळात माणुसकी अजून संपली नाही काळ आहे वाईट, आहे मला मान्य पण गरज पडताच इथे, जन्म घेतात लोकमान्य अजूनही टिकून आहे फुलांमधे सुगंध मनाला उब देतात प्रेमाचे अनुबंध टिकून आहे अजून मैत्रीतला विश्वास जगण्याला हा देतो एक नवा आत्मविश्वास अजूनही करतो मनाला पहाटवारा धुंध अजुनही आकाशात पक्षी फिरतात स्वछंद कितीही घातला वाद तरी मुले ऐकतात पालकांचे, आई बाबाही पुरवतात अजून लाड त्यांच्या बालकांचे दुःख सुद्धा मी आनंदाने घेईन Happy days are here again आनंदाने सांगीन. अतुल दिवाकर
- Get link
- X
- Other Apps
बालपण आज अचानक मला आठवले बालपणातील काही क्षण हवे ते मिळाले पाहिजे तेव्हा, किती छान होते माझे बालपण खावे प्यावे मस्त हुंदडावे, आरामाचे सुंदर जीवन नाही चिंता नाही गडबड, होते फक्त भाबडे मन सगळे नाचती तालावर माझ्या, करती वेडे चाळे हसता मी होई आनंद, रडता मी ते दुःखी सगळे बोट धरूनी मला चालविती, मी चालता उड्या मारती माझ्या छोट्या छोट्या चाळ्यांनी आनंदाने भान हरपती काळ लोटला, बालपण माझे जबाबदारीने केले भक्षण आज अचानक मला आठवले बालपणातील काही क्षण अतुल दिवाकर
- Get link
- X
- Other Apps
काळोख सगळीकडे काळोख, मी जातो तिमीराकडे अंधारलेल्या वाटा, मला घेऊन जाती कोठून कोठे हसता हसता आयुष्यात, येतो एक रूसवा मृगजळाप्रमाणे आहे माझा, आनंदही फसवा डोळे भरून येतात, होते जग अस्पष्ट घडता घडता माझे, विश्व होते नष्ट मनाला सतत छळतो, हा नात्यांमधील दुरावा आशाळभूत मी शोधत राहतो, क्षणभर विसावा पिसारा फुलवून परत, नाचेल का मोर कधी संपेल हा, माझ्या जीवनाचा घोर अतुल दिवाकर
- Get link
- X
- Other Apps
आजकाल आजचा जमाना आहे फास्टफूड व रिमोटचा पण कालचा नक्कीच होता आपुलकी व मायेचा आम्ही तोलतो प्रत्येक गोष्ट पैशात आज पण काल होता नात्यांना माणुसकीचा साज कायम हवे नाविन्य बदलणारी धेय्ये सतत टिकून राहणे परंपरा कालची काम हवे सतत जग झाले छोटे पण ते झाले मायावी आजीची झोपतांनाची गोष्ट आम्ही कशी विसरावी नको कुठले नियम पिढी झाली बेफाम परंपरा पाळणे हेच होते तेव्हा काम कुठून कुठे गेले जग कामाची वाढली व्याप्ती जरा जपून पुढे जा कारण अती तेथे माती अतुल दिवाकर
- Get link
- X
- Other Apps
सुदिन गणपती बाप्पा मोरया दरवर्षी नक्की या एकेकाळचे सुंदर रूप जोश उत्सवाचा आजकालची पिढी होश हरवलेला पूर्वी एक ध्येय होते होता जनजागृतीचा वारसा आजच्या पिढीला मात्र फरक पडत नाही फारसा तरीदेखील बाप्पा, तू नक्की ये तुझी वाट बघणार्यांना दर्शन दे तू बाप्पा आहेस, बुद्धीचा देव कर आम्हाला मार्गावर आणायची थोडीशी उठाठेव बदलणार आहे परीस्थिती येणार आहेत अच्छे दिन बाप्पा तू जर मनावर घेतलेस तर का नाही होणार, हर दिन सुदिन अतुल दिवाकर
- Get link
- X
- Other Apps
गॅझेट्स आजकाल आपण गॅझेट बद्दल फार वाचतो त्यांच्या मुळे त्रास होतो म्हणून सतत सांगतो सातासमूद्रा पलिकडील जग क्षणात समोर आले Technology मुळेच तर हे possible झाले काळजी करणार्या आईला मी देऊ शकतो माझा पत्ता Mobile ची आहे ही अगाध सत्ता तिची चिंता मी क्षणात मिटवू शकतो गॅझेट मुळेच तर तिला आनंद देऊ शकतो विसरू नयेत गोष्टी म्हणून reminder मी लावतो कसे लक्षात ठेवले म्हणून शेखी मिरवतो घरात बसून ऑफिस, ऑफिस मधे घर Laptop मुळेच हे शक्य झाले बरं किती ही flexibility आयुष्य सोपे झाले Advance technology हा मंत्र माझे मन बोले ठरवलं तर मी नाही त्यांच्या आहारी जात त्यांचे सर्व उपयोगच ठेवतो मी लक्षात आजकाल मी गॅझेट बद्दल नवीन नवीन वाचतो ते खूप उपयोगी आहेत म्हणून आनंदाने नाचतो अतुल दिवाकर
- Get link
- X
- Other Apps
निर्माण तूच निर्मिली वसुंधरा तूच केला निर्माण मानव तूच दिलीस त्याला बुद्धी पण तोच आता झाला दानव तुला कदाचित वाटले नसेल हाच माणूस डोक्यावर बसेल तुझी असेल अपेक्षा साधी तो फिरतो लावून नाना उपाधी स्वतःचे नसतांना देखील ओरबाडतो स्वार्थी बनून तो लबाड छळतो बिचारी धरा सर्व सहन करते निमूटपणे ती कृपा करत राहते कसे समजवावे ह्या माणसाला नाही सुधारलास तर तयार हो मरणाला हातात नाही आता जास्त वेळ लवकरच नाहीतर संपेल हा खेळ माणसा तू माणसाला माणसासारखे वागव दुर्योधनाला नको, तुझ्यातल्या कृष्णाला जागव कर अपार कष्ट, झटकून टाक सुस्ती देवही मग येथे आनंदाने करतील वस्ती अतुल दिवाकर
- Get link
- X
- Other Apps
कलाटणी आज अचानक मला वाटले किती विचार ते मनी साठले घ्यावी आज मानसिक सुट्टी करावी आज पुस्तकांशी गट्टी सुंदर विचार मला आवडला मनालाही तो खूप भावला झटकली मग पुस्तकांवरची धूळ घेतले जेव्हा ते वाचायचे खूळ भराभरा वाचून काढली चार हाती लागली त्यावर झालो स्वार माझी जन्मठेप, काळे पाणी भारावून गेलो त्या क्षणी गेलो एका वेगळ्याच विश्वात गुंग झालो मनातल्या मनात विसर पडला वर्तमानाचा काय वर्णू खेळ मनाचा ठरले आता रोजच वाचायचे मनाला ताजेतवाने ठेवायचे आनंदाची द्यायची फोडणी कंटाळ्याला ऊत्साहाची जोडणी अतुल दिवाकर
- Get link
- X
- Other Apps
जागा हो जागा हो मानवा जागा हो अजून किती भोगायचे भोग ह्या कलियुगात का बरे असावे देव फक्त स्वर्गात तू देखील बनू शकतोस देव निर्बलांच्या रक्षणासाठी तूच एकमेव माणूस झाला आज माणुसकीला पारखा आणि दोष देत आहे नशिबाला सारखा ऊठ आणि घे स्वतःच्या हातात गदा नको वाट पाहू देवाची सदा न कदा काय कमी आहे तुझ्यात म्हणून तू पुढे येत नाहीस तू पुढे आलास तर देवालाही राहणार नाही चाॅईस तुझ्या अंगात येईल दैवी बळ मिळेल सर्वांना त्याचे चांगले फळ महाभारतात कृष्ण रामायणात राम कलियुगात मात्र फक्त तुझेच काम नाही येणार कोणी मदतीला तुझ्या तूच इथला देव नाही शंका मनात माझ्या संपवून टाक येथील सर्व कंसांना शिल्लक नको ठेवूस दुर्योधनांना तुझ्या बळावर आहे माझा विश्वास पूर्ण लवकरच बनणार आहे सुंदर हे जग संपूर्ण अतुल दिवाकर
- Get link
- X
- Other Apps
सफलतेचा मंत्र अनंत या ब्रम्हांडामध्ये एक ठिपका म्हणजे पृथ्वी त्या पृथ्वीवर एक छोटा लहानसा कण मी एवढेसे असून आस्तित्व स्वतःविषयी बाळगतो अभिमान विषयसुखामधे राहतो लिप्त फक्त ठेवतो स्वतःवर ध्यान हातातील अनमोल क्षण आनंदाने घालवतो वाया कितीही नाही म्हटले तरी कर्मच बनते माझी छाया गुरूंनी दाखविले, आईने सांगितले घडवण्यासाठी कष्ट घेतले स्वतःमध्येच रममाण मी त्यांचे प्रयत्न नाही दिसले आता तरी तू जागा हो व्यर्थ अभिमान बाळगू नको सोडून दे हा सततचा स्वार्थ सफलतेचा मंत्र परमार्थ अतुल दिवाकर
- Get link
- X
- Other Apps
माझे मन मी चालतो हळूहळू पण मनाचा वेग प्रकाशापेक्षा जास्त माझी उडी काही दिवसांची पण मन करते वर्षे फस्त मी थकतो एका दिवसात मन कधीच थकत नाही घ्यावी म्हणतो थोडी विश्रांती मन मात्र घेऊ देत नाही मी सांभाळतो स्वतःला नाही जाऊ देत out of control हताश होतो जेव्हा घेते मनच सर्व control प्रत्येक दिवशी प्रत्येक वर्षी मी सोडतो नवे संकल्प मनापुढे मात्र पडतात सर्व माझे प्रयत्न अल्प किती होईल आयुष्य सोपे कमी होतील बरेच त्रास माझ्या ताब्यात मन राहीले तर जीवन माझे एकदम झकास अतुल दिवाकर
- Get link
- X
- Other Apps
फिटे अंधाराचे जाळे या गाण्याची चाल असलेले विडंबनात्मक गीत........ भक्ती करतात सारे आहे जोपर्यंत हा श्वास जपनामाने होते हो आयुष्य हे खास खास | लोक जागे झाले सारे उत्साह तो पसरला सूर्य आकाशात येता दिवस सुरू झाला सारे रोजचे तरीही नवा प्रकाश प्रकाश | मनी विश्वास जागता किती सोपे सारे होते आपल्याच हातामध्ये भविष्य हो दिसू लागे क्षणापूर्वीचे पालटे जग वाटे खास खास | जुना कालचा दिवस झाली आजची पहाट भक्तांचा हो देवांना भक्तिने अभिषेक एक अनोखी ही नशा आली लोकात लोकात | अतुल दिवाकर
- Get link
- X
- Other Apps
माझे स्वप्न असावे माझे छोटेसे घर माणुसकीच्या जगामध्ये जेथे कळते मनाला मन भावना असती स्पर्शामध्ये नात्यांची जेथे आहेत झाडे नाही जंगल सिमेंटचे न बोलताही कळते सारे नाही मार शब्दांचे दिवस उगवतो आनंदाने आणि मावळतो समाधानाने स्वास्थासाठी योग्य दिनक्रम मोजणे नाही पैशामध्ये हिरवळ जेथे फुलवतो निसर्ग बागडती पक्षी निर्भयतेने साथ देती वृक्षवल्ली मित्रत्वाच्या नात्याने काकड आरती, पूजाअर्चा असती माझे सखे सोबती देवालाही वाटे यावे आपलेपणाने माझे संगती अतुल दिवाकर
- Get link
- X
- Other Apps
एक तारीख आजचा दिवस तारीख एक वाट पाहतात लोक अनेक बायको विचारते घेणार ना चहा भरुन येते हृदय पहा जग आज वाटते आनंदी मन बागडते होऊन स्वच्छंदी सगळ्या गोष्टी दिसतात सुरेख कारण आज तारीख एक मी खिशाकडे बघतो खुशीत हसतो हळूच मिशीतल्या मिशीत घ्यावीशी वाटते गोष्ट प्रत्येक कारण आज तारीख एक देवा सर्व दिवस जाऊदे असेच नको दुःख, खचू देऊ नको ऊमेद होऊ दे सर्वांच्या इच्छा पूर्ण आनंदी राहू दे जग संपूर्ण अतुल दिवाकर
- Get link
- X
- Other Apps
सावली जिथे जिथे मी जातो तिथे तिथे तू असतेस पण फक्त प्रकाशात, अंधारात मला सोडून जातेस का? तुला पण अंधाराचे भय वाटते का अग असे घाबरू नकोस, इथे भयावह खूप गोष्टी आहेत आज माणूस माणूसकीला पारखा झाला आहे इथे मुलांचे बालपण आणि मोठ्यांचे शहाणपण हरवले आहे इथे उत्तरांपेक्षा प्रश्नच जास्त आहेत आणि समाधानापेक्षा अपेक्षा जास्त आहेत जेव्हा हवी असते साथ तेव्हा मिळतो विश्वासघात सज्जनांवर केली आहे दुष्टांनी मात ज्यांनी द्यायचा आधार त्यांनी सोडले वार्यावर कोठे कोठे लावू ठिगळ इथे सगळे घरच उघड्यावर पण तरी मी आहे आशावादी, नाही हरणार हिम्मत द्यावी लागली जरी माझ्या आयुष्याची किम्मत माझ्याकडे आहे पूर्ण आत्मविश्वास जग बदलून टाकीन हा विश्वास आहे खास म्हणून तुला सांगतो नको तू घाबरून जाउस ठेव माझ्यावर विश्वास नको मला अंधारात सोडून जाऊस अतुल दिवाकर
- Get link
- X
- Other Apps
घर घर शब्द दोनच अक्षरी पण दिलासा देणारा माझं घर चार अक्षरी शब्द अभिमानाने सांगण्यासारखा आपलं घर पाच अक्षरी शब्द हवा हवासा वाटणारा जेव्हा मी थकून भागून घरी येतो तेव्हा मायेचा हात फिरवणारा जेव्हा मी खूप नाराज असतो तेव्हा हक्काने चिडचिड सहन करणारा माझ्या आनंदात सहभागी होणारा आणि दुःख हक्काने share करणारा माझा मित्र घर म्हणजे चार भिंती, दार आणि खिडक्या नाहीत तर माया करणारी, हक्काने भांडण्याची आणि स्वतःला शोधण्याची जागा याने मला मोठा होतांना पाहीले आनंदात हसतांना आणि दुःखात रडतांना ऐकले पण त्रास होतो म्हणून हा मित्र नाही कधी ओरडला उलट सतत हा माझे लाड पुरवत राहीला मित्रा मी तुझा खूप खूप आभारी आहे माझ्यातच रमलेल्या मला तुझ्याकडे लक्ष देता आले नाही म्हणून तू चिडलास तर नाही ना आजपासून मी स्वतःला बाजूला ठेऊन नक्की तुझी काळजी घेईन मग पहिल्यासारखे परत माझ्यावर प्रेम करशील ना अतुल दिवाकर
- Get link
- X
- Other Apps
मैत्री ही मैत्री असते सर्वांची सेम असते कट्यावरती ती फुलते भेटीमुळे ती वाढते Login तिला संपर्कात ठेवते Sign out तिची आठवण वाढवते WA, FB तिचे दोन हात पण तिला असते सतत ह्रदयाची साथ आनंद तिचा गुण, हक्क तिचा धर्म हास्य तिचा स्वभाव, सोबत तिचे कर्म जरी Technology ने तिच्यात रंग भरले तरी तिने नाही आपले मूळ अंग बदलले ती आहे शब्दांशिवाय व्यक्त होणारी भावना Technology तिच्याशी नाही करू शकत सामना अतुल दिवाकर