गिरणीवाला

दळता कांडता जीवन संपे
लई अवघड हे जगणे नाही सोपे
दिवस उगवतो तसा मावळतो
उभ्या उभ्याने मी घाम गाळतो

कधी जवार कधी गहू कधी कधी डाळीचे दळण
कधी लाडू कधी थालीपीठ गोल गोल  चकलीचे वळण

कष्ट करतो सर्वांसाठी देतो दोन आनंदाचे क्षण
दिवस सरतो तेव्हा पडती पोटामध्ये अन्नाचे ते चार कण

प्रत्येकाला असते घाई थांबायला तो नसतो वेळ
सणासुदीला आमच्या ताटी भाकर आणि गोड केळ

गिरणीची ती छोटी खोली सर्वत्र पसरती बारीक कण
सर्व ऋतूंमधे काम करतो नाही सुट्टी नाही सण

आनंदी मी उत्साही मी जन्म सार्थकी कष्टाचा
कमी असला तरी नाही माझा पैसा हरामाचा

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ