प्रश्न

का बरे मला असे प्रश्न इथे पडतात
देवाच्या राज्यात रोज अपराध का घडतात

वात्सल्याचे सुदंर नाते कुस्करून टाकतो बाप
आपल्याच पिल्लाला डसतो बनून विषारी साप
नात्यांची ही नाती अशी का सडतात
का बरे मला असे प्रश्न इथे पडतात

भावाच्या नात्याला भाऊच देतो तडा
पैशासाठी सांडतो रक्ताचा सडा
आपले भाऊबंद आपल्यालाच नडतात
का बरे मला असे प्रश्न इथे पडतात

तू कोण मी कोण हे जग आहे कोणाचे
स्वार्थासाठी बघ इथे कोणी नाही कोणाचे
रोज रोज इथे अपराध नवे घडतात
का बरे मला असे प्रश्न इथे पडतात

पोटच्या जीवाला उकिरड्यावर सोडतात
रक्ताची ही नाती किती सहजपणे तोडतात
आयुष्य आनंदाने एकटेपणात काढतात
का बरे मला असे प्रश्न इथे पडतात

देवा तू कुठे आहेस बघ तुझी लेकरे
आपल्याच लोकांना किती रे ओरबाडतात
अवतार घे लवकर नको राहू जडत्वात
का बरे मला असे प्रश्न इथे पडतात

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ