आजचे कुटुंब

आज जरी मी आहे विभक्त, तरी उभा मी पायावर माझ्या
मान्य मला ही कुटुंबरचना, त्रास का रे मना तुझ्या

परावलंबी नाही जगणे आनंदाची आहे ना बाब
स्वतःच्या मस्तीत गुंग असतो नाही कुणाला देतो ताप

माॅडर्न मी इंडिपेंडट मी जगाबरोबर चालतो मी
क्षणात इथे तर क्षणात तिथे जगाच्या कोपर्‍यात जातो मी

जरी मी स्वार्थी जरी मी निर्दयी निष्ठुर आणि उद्धट मी
आजही जन्मती टिळक, फुले अन  मदर तेरेसा त्याच्या संगती

वृद्ध माणसे अडगळ झाली घरामधे ती झाली ओझे
नाही विसरलो जबाबदारी , वृद्धाश्रमही कुटुंब माझे

वाव मला सुधारण्याचा मान्य मला नाही शंका
जिद्द ठेवतो भारतभूमी करणार सोन्याची लंका

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ