सफलतेचा मंत्र
अनंत या ब्रम्हांडामध्ये
एक ठिपका म्हणजे पृथ्वी
त्या पृथ्वीवर एक छोटा
लहानसा कण मी
एवढेसे असून आस्तित्व
स्वतःविषयी बाळगतो अभिमान
विषयसुखामधे राहतो लिप्त
फक्त ठेवतो स्वतःवर ध्यान
हातातील अनमोल क्षण
आनंदाने घालवतो वाया
कितीही नाही म्हटले तरी
कर्मच बनते माझी छाया
गुरूंनी दाखविले, आईने सांगितले
घडवण्यासाठी कष्ट घेतले
स्वतःमध्येच रममाण मी
त्यांचे प्रयत्न नाही दिसले
आता तरी तू जागा हो
व्यर्थ अभिमान बाळगू नको
सोडून दे हा सततचा स्वार्थ
सफलतेचा मंत्र परमार्थ
अतुल दिवाकर
अनंत या ब्रम्हांडामध्ये
एक ठिपका म्हणजे पृथ्वी
त्या पृथ्वीवर एक छोटा
लहानसा कण मी
एवढेसे असून आस्तित्व
स्वतःविषयी बाळगतो अभिमान
विषयसुखामधे राहतो लिप्त
फक्त ठेवतो स्वतःवर ध्यान
हातातील अनमोल क्षण
आनंदाने घालवतो वाया
कितीही नाही म्हटले तरी
कर्मच बनते माझी छाया
गुरूंनी दाखविले, आईने सांगितले
घडवण्यासाठी कष्ट घेतले
स्वतःमध्येच रममाण मी
त्यांचे प्रयत्न नाही दिसले
आता तरी तू जागा हो
व्यर्थ अभिमान बाळगू नको
सोडून दे हा सततचा स्वार्थ
सफलतेचा मंत्र परमार्थ
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment