फिटे अंधाराचे जाळे या गाण्याची चाल असलेले विडंबनात्मक गीत........
भक्ती करतात सारे
आहे जोपर्यंत हा श्वास
जपनामाने होते हो
आयुष्य हे खास खास |
आहे जोपर्यंत हा श्वास
जपनामाने होते हो
आयुष्य हे खास खास |
लोक जागे झाले सारे
उत्साह तो पसरला
सूर्य आकाशात येता
दिवस सुरू झाला
सारे रोजचे तरीही
नवा प्रकाश प्रकाश |
उत्साह तो पसरला
सूर्य आकाशात येता
दिवस सुरू झाला
सारे रोजचे तरीही
नवा प्रकाश प्रकाश |
मनी विश्वास जागता
किती सोपे सारे होते
आपल्याच हातामध्ये
भविष्य हो दिसू लागे
क्षणापूर्वीचे पालटे
जग वाटे खास खास |
किती सोपे सारे होते
आपल्याच हातामध्ये
भविष्य हो दिसू लागे
क्षणापूर्वीचे पालटे
जग वाटे खास खास |
जुना कालचा दिवस
झाली आजची पहाट
भक्तांचा हो देवांना
भक्तिने अभिषेक
एक अनोखी ही नशा
आली लोकात लोकात |
झाली आजची पहाट
भक्तांचा हो देवांना
भक्तिने अभिषेक
एक अनोखी ही नशा
आली लोकात लोकात |
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment