एक तारीख
आजचा दिवस तारीख एक
वाट पाहतात लोक अनेक
बायको विचारते घेणार ना चहा
भरुन येते हृदय पहा
जग आज वाटते आनंदी
मन बागडते होऊन स्वच्छंदी
सगळ्या गोष्टी दिसतात सुरेख
कारण आज तारीख एक
मी खिशाकडे बघतो खुशीत
हसतो हळूच मिशीतल्या मिशीत
घ्यावीशी वाटते गोष्ट प्रत्येक
कारण आज तारीख एक
देवा सर्व दिवस जाऊदे असेच
नको दुःख, खचू देऊ नको ऊमेद
होऊ दे सर्वांच्या इच्छा पूर्ण
आनंदी राहू दे जग संपूर्ण
अतुल दिवाकर
आजचा दिवस तारीख एक
वाट पाहतात लोक अनेक
बायको विचारते घेणार ना चहा
भरुन येते हृदय पहा
जग आज वाटते आनंदी
मन बागडते होऊन स्वच्छंदी
सगळ्या गोष्टी दिसतात सुरेख
कारण आज तारीख एक
मी खिशाकडे बघतो खुशीत
हसतो हळूच मिशीतल्या मिशीत
घ्यावीशी वाटते गोष्ट प्रत्येक
कारण आज तारीख एक
देवा सर्व दिवस जाऊदे असेच
नको दुःख, खचू देऊ नको ऊमेद
होऊ दे सर्वांच्या इच्छा पूर्ण
आनंदी राहू दे जग संपूर्ण
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment