युरेका

कसा आवरू या मनाला किती हे इकडून तिकडे पळते
जरी म्हटले सरळ चल तरी सतत तिरके वळते

ध्यान केले जप केला रामनामाचा गजर केला
कळलेच नाही तरीसुद्धा कंट्रोल कधी सुटून गेला

समजावले किती सांगितले किती, कितीतरी घेतले श्रम
एका झटक्यात वाया गेले सर्व माझे परीश्रम

काहीच मला कळेना काहीच आता उमजेना
कसे त्याला समजवू कोणीच मला सांगेना

विचार करून पिकले डोके, बुद्धी काही चालेना
मार्ग कसा काढावा माझे मलाच समजेना

मग ठरवले काही झाले तरी हे युद्ध जिंकायचे
एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून असे नाही हरायचे

समजवासमजवी पुरे झाली आता हवी कृती
अन्यथा माझ्याबरोबरच सर्वांची बिघडेल प्रकृती

त्या क्षणापासून मला समजेना काय झाले
एवढे मात्र नक्की झाले मन पळायचे थांबले

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ