सहजच

आनंदाला उत्साहाची जोडणी
दुःखावर सुखाची फोडणी
निराशेवर करते मात आशा
क्रूरतेला समजावते माणुसकीची भाषा

वादावादीवर समजुतीचा तोडगा
भयाला निर्भयतेचा बडगा
नसता आवेश आणू नको उगा
नाहीतर प्रकृती तुला देईल दगा

रडणार्‍यांना तुम्ही थोडेसे हसवा
पडणार्‍यांना हात देउन सावरा
मृगजळाप्रमाणे जर विश्वास असेल फसवा
तर नात्यांमधे जीव होतो कावराबावरा

मनातील गोष्टी ओठावर आणा
नाहीतर मिळेल नारळ नजराणा
अंगी येऊ दे लढाऊ बाणा
वेळेचे वेळेवर महत्व जाणा

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ