माझे मन

मी चालतो हळूहळू
पण मनाचा वेग प्रकाशापेक्षा जास्त
माझी उडी काही दिवसांची
पण मन करते वर्षे फस्त

मी थकतो एका दिवसात
मन कधीच थकत नाही
घ्यावी म्हणतो थोडी विश्रांती
मन मात्र घेऊ देत नाही

मी सांभाळतो स्वतःला
नाही जाऊ देत out of control
हताश होतो जेव्हा
घेते मनच सर्व control

प्रत्येक दिवशी प्रत्येक वर्षी
मी सोडतो नवे संकल्प
मनापुढे मात्र पडतात
सर्व माझे प्रयत्न अल्प

किती होईल आयुष्य सोपे
कमी होतील बरेच त्रास
माझ्या ताब्यात मन राहीले
तर जीवन माझे एकदम झकास

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ