जागा हो

जागा हो मानवा जागा हो
अजून किती भोगायचे भोग ह्या कलियुगात
का बरे असावे देव फक्त स्वर्गात
तू देखील बनू शकतोस देव
निर्बलांच्या रक्षणासाठी तूच एकमेव

माणूस झाला आज माणुसकीला पारखा
आणि दोष देत आहे नशिबाला सारखा
ऊठ आणि घे स्वतःच्या हातात गदा
नको वाट पाहू देवाची सदा न कदा

काय कमी आहे तुझ्यात म्हणून तू पुढे येत नाहीस
तू पुढे आलास तर देवालाही राहणार नाही चाॅईस
तुझ्या अंगात येईल दैवी बळ
मिळेल सर्वांना त्याचे चांगले फळ

महाभारतात कृष्ण रामायणात राम
कलियुगात मात्र फक्त तुझेच काम
नाही येणार कोणी मदतीला तुझ्या
तूच इथला देव नाही शंका मनात माझ्या

संपवून टाक येथील सर्व कंसांना
शिल्लक नको ठेवूस दुर्योधनांना
तुझ्या बळावर आहे माझा विश्वास पूर्ण
लवकरच बनणार आहे सुंदर हे जग संपूर्ण

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ