सावली

जिथे जिथे मी जातो तिथे तिथे तू असतेस
पण फक्त प्रकाशात, अंधारात मला सोडून जातेस
का? तुला पण अंधाराचे भय वाटते का

अग असे घाबरू नकोस, इथे भयावह खूप गोष्टी आहेत
आज माणूस माणूसकीला पारखा झाला आहे
इथे मुलांचे बालपण आणि मोठ्यांचे शहाणपण हरवले आहे
इथे उत्तरांपेक्षा प्रश्नच जास्त आहेत आणि
समाधानापेक्षा अपेक्षा जास्त आहेत

जेव्हा हवी असते साथ तेव्हा मिळतो विश्वासघात
सज्जनांवर केली आहे दुष्टांनी मात
ज्यांनी द्यायचा आधार त्यांनी सोडले वार्‍यावर
कोठे कोठे लावू ठिगळ इथे सगळे घरच उघड्यावर

पण तरी मी आहे आशावादी, नाही हरणार हिम्मत
द्यावी लागली जरी माझ्या आयुष्याची किम्मत
माझ्याकडे आहे पूर्ण आत्मविश्वास
जग बदलून टाकीन हा विश्वास आहे खास

म्हणून तुला सांगतो नको तू घाबरून जाउस
ठेव माझ्यावर विश्वास नको मला अंधारात सोडून जाऊस

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ