बालपण

आज अचानक मला आठवले बालपणातील काही क्षण
हवे ते मिळाले पाहिजे तेव्हा, किती छान होते माझे बालपण

खावे प्यावे मस्त हुंदडावे, आरामाचे सुंदर जीवन
नाही चिंता नाही गडबड, होते फक्त भाबडे मन

सगळे नाचती तालावर माझ्या, करती वेडे चाळे
हसता मी होई आनंद, रडता मी ते दुःखी सगळे

बोट धरूनी मला चालविती, मी चालता उड्या मारती
माझ्या छोट्या छोट्या चाळ्यांनी आनंदाने भान हरपती

काळ लोटला, बालपण माझे जबाबदारीने केले भक्षण
आज अचानक मला आठवले बालपणातील काही क्षण

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ