होळी

रंगांचा सण होळी
खावी पुरणपोळी
घेऊन भांगेची गोळी
झिंगली जनता भोळी

रंगमय झाल्या दिशा
चढली होळीची नशा
पाण्यात भिजल्या कशा
आशा, उषा व मनिषा

सोडू नका रे कोणाला
जरी नाही म्हणाला
रंगवा सर्व जणांला
मजा येईल सणाला

बुडवा राग हेवेदावे
आनंद वाटा सर्वांसवे
आता आम्हा हवे आहे
सुंदर असे जग नवे

होळीच्या रंगीत शुभेच्छा

अतुल  दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ