गॅझेट्स

आजकाल आपण गॅझेट बद्दल फार वाचतो
त्यांच्या मुळे त्रास होतो म्हणून सतत सांगतो

सातासमूद्रा पलिकडील जग क्षणात समोर आले
Technology मुळेच तर हे possible झाले

काळजी करणार्‍या आईला मी देऊ शकतो माझा पत्ता
Mobile ची आहे ही अगाध सत्ता

तिची चिंता मी क्षणात मिटवू शकतो
गॅझेट मुळेच तर तिला आनंद देऊ शकतो

विसरू नयेत गोष्टी म्हणून reminder मी लावतो
कसे लक्षात ठेवले म्हणून शेखी मिरवतो

घरात बसून ऑफिस, ऑफिस मधे घर
Laptop मुळेच हे शक्य झाले बरं

किती ही flexibility आयुष्य सोपे झाले
Advance technology हा मंत्र माझे मन बोले

ठरवलं तर मी नाही त्यांच्या आहारी जात
त्यांचे सर्व उपयोगच ठेवतो मी लक्षात

आजकाल मी गॅझेट बद्दल नवीन नवीन वाचतो
ते खूप उपयोगी आहेत म्हणून आनंदाने नाचतो

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ