कलाटणी

आज अचानक मला वाटले
किती विचार ते मनी साठले
घ्यावी आज मानसिक सुट्टी
करावी आज पुस्तकांशी गट्टी

सुंदर विचार मला आवडला
मनालाही तो खूप भावला
झटकली मग पुस्तकांवरची धूळ
घेतले जेव्हा ते वाचायचे खूळ

भराभरा वाचून काढली चार
हाती लागली त्यावर झालो स्वार
माझी जन्मठेप, काळे पाणी
भारावून गेलो त्या क्षणी

गेलो एका वेगळ्याच विश्वात
गुंग झालो मनातल्या मनात
विसर पडला वर्तमानाचा
काय वर्णू खेळ मनाचा

ठरले आता रोजच वाचायचे
मनाला ताजेतवाने ठेवायचे
आनंदाची द्यायची फोडणी
कंटाळ्याला ऊत्साहाची जोडणी

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ