निर्माण
तूच निर्मिली वसुंधरा
तूच केला निर्माण मानव
तूच दिलीस त्याला बुद्धी
पण तोच आता झाला दानव
तुला कदाचित वाटले नसेल
हाच माणूस डोक्यावर बसेल
तुझी असेल अपेक्षा साधी
तो फिरतो लावून नाना उपाधी
स्वतःचे नसतांना देखील ओरबाडतो
स्वार्थी बनून तो लबाड छळतो
बिचारी धरा सर्व सहन करते
निमूटपणे ती कृपा करत राहते
कसे समजवावे ह्या माणसाला
नाही सुधारलास तर तयार हो मरणाला
हातात नाही आता जास्त वेळ
लवकरच नाहीतर संपेल हा खेळ
माणसा तू माणसाला माणसासारखे वागव
दुर्योधनाला नको, तुझ्यातल्या कृष्णाला जागव
कर अपार कष्ट, झटकून टाक सुस्ती
देवही मग येथे आनंदाने करतील वस्ती
अतुल दिवाकर
तूच निर्मिली वसुंधरा
तूच केला निर्माण मानव
तूच दिलीस त्याला बुद्धी
पण तोच आता झाला दानव
तुला कदाचित वाटले नसेल
हाच माणूस डोक्यावर बसेल
तुझी असेल अपेक्षा साधी
तो फिरतो लावून नाना उपाधी
स्वतःचे नसतांना देखील ओरबाडतो
स्वार्थी बनून तो लबाड छळतो
बिचारी धरा सर्व सहन करते
निमूटपणे ती कृपा करत राहते
कसे समजवावे ह्या माणसाला
नाही सुधारलास तर तयार हो मरणाला
हातात नाही आता जास्त वेळ
लवकरच नाहीतर संपेल हा खेळ
माणसा तू माणसाला माणसासारखे वागव
दुर्योधनाला नको, तुझ्यातल्या कृष्णाला जागव
कर अपार कष्ट, झटकून टाक सुस्ती
देवही मग येथे आनंदाने करतील वस्ती
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment