विचार

बसलो होतो शांत निवांत एकटाच करत विचार
मन घालत होते डोक्यात विचारांचे आचार
काही होते गोड तर काही एकदम झणझणीत
एवढेस्से माझे डोके किती विचार साठवणीत ।

काही मवाळ धोतर सदर्‍यातले तर काहींची होती कडक वर्दी
दाटीवाटीने बसून डोक्यात केली भाऊगर्दी
मीठ नसलेल्या भाजीसारखे काही होते बेचव
पळत होते सशासारखे काही संथ कासव ।

रूतलेल्या बाणासारखे टोचत होते काही
सांडत होते काही जशी गळक्या पेनातली शाई
ओरडत होते काही जणू वाघाच्या डरकाळ्या
सरपटत होते काही जशा टम्म फुगलेल्या अळ्या ।

त्यातच दिसला एक जो बसला होता शांत
कळेना मला इतक्या गर्दीत हा कसा निवांत
कारण विचारता तो बघून गोड हसला
म्हणाला अरे राजा जो नाही वर्तमानात तोच इथे फसला ।

अतुल दिवाकर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ