घर

घर शब्द दोनच अक्षरी पण दिलासा देणारा
माझं घर चार अक्षरी शब्द अभिमानाने सांगण्यासारखा
आपलं घर पाच अक्षरी शब्द हवा हवासा वाटणारा

जेव्हा मी थकून भागून घरी येतो तेव्हा मायेचा हात फिरवणारा
जेव्हा मी खूप नाराज असतो तेव्हा हक्काने चिडचिड सहन करणारा
माझ्या आनंदात सहभागी होणारा आणि दुःख हक्काने share करणारा माझा मित्र 

घर म्हणजे चार भिंती, दार आणि खिडक्या नाहीत
तर माया करणारी,  हक्काने भांडण्याची आणि स्वतःला शोधण्याची जागा

याने मला मोठा होतांना पाहीले
आनंदात हसतांना आणि दुःखात रडतांना ऐकले
पण त्रास होतो म्हणून हा मित्र नाही कधी ओरडला
उलट सतत हा माझे लाड पुरवत राहीला

मित्रा मी तुझा खूप खूप आभारी आहे
माझ्यातच रमलेल्या मला तुझ्याकडे लक्ष देता आले नाही म्हणून तू चिडलास तर नाही ना

आजपासून मी स्वतःला बाजूला ठेऊन नक्की तुझी काळजी घेईन
मग पहिल्यासारखे परत माझ्यावर प्रेम करशील ना

अतुल दिवाकर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ